Commercial Real Estate – आता सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात
- Swapnil Joshi
- Mar 18
- 2 min read

पूर्वी कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचा खेळ असे मानले जायचे.
कारण मोठ्या ऑफिस बिल्डिंग्स किंवा बिझनेस पार्कमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठी रक्कम लागायची.
परंतु आता REIT (Real Estate Investment Trust) या संकल्पनेमुळे लहान गुंतवणूकदारांनाही या क्षेत्रात गुंतवणूक करता येते. Real Estate Investment Trust
REIT मुळे तुम्ही मोठे ऑफिस पार्क, आयटी पार्क किंवा शॉपिंग मॉल यांसारख्या कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये अगदी छोट्या रकमेपासूनही गुंतवणूक करू शकता.
REIT म्हणजे नेमके काय?
REIT ला आपण रिअल इस्टेटमधील म्युच्युअल फंड असे म्हणू शकतो.
जसे म्युच्युअल फंड अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून शेअर्समध्ये गुंतवणूक करतो, तसेच REIT गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करून कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतो.
या प्रॉपर्टीजमधून जे भाडे (Rental Income) मिळते त्यातून खर्च वजा करून उरलेली रक्कम गुंतवणूकदारांना वितरित केली जाते.
भारतामध्ये नियम असा आहे कीREIT ला त्याच्या किमान 90% उत्पन्न गुंतवणूकदारांना द्यावे लागते.
REIT मध्ये गुंतवणूक कशी करायची?
REIT युनिट्स हे शेअर्ससारखेच स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड असतात.
म्हणजेच:
तुम्ही डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट वापरून REIT खरेदी करू शकता
जसे शेअर खरेदी-विक्री करता तसेच REIT देखील खरेदी-विक्री करता येते
तुम्हाला नियमित वितरण (distribution income) मिळू शकते
REIT चे फायदे
भाडे उत्पन्न (Rental Income)
कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये लहान रकमेने गुंतवणूक
डायव्हर्सिफिकेशन – पोर्टफोलिओमध्ये वेगळा अॅसेट क्लास
कॅपिटल appreciation ची शक्यता
भारतामध्ये आतापर्यंत REIT गुंतवणूकदारांना सुमारे 7% ते 8% वितरण उत्पन्न मिळाले आहे (करपूर्व).
गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवावे?
REIT चे किंमती शेअर्सप्रमाणे बाजारानुसार बदलतात
ऑफिस स्पेसची मागणी कमी-जास्त झाली तर परिणाम होऊ शकतो
त्यामुळे REIT मध्ये गुंतवणूक किमान 3–5 वर्षांसाठी करणे योग्य मानले जाते.
घटक | ५० लाखांची (Physical Property) | ५० लाख REITs मध्ये गुंतवणूक |
अपेक्षित उत्पन्न | 10000-15000 महिना | 25000 to 33000 महिना बाजाराच्या स्थितीनुसार (7 to 8%) |
तरलता/ रोखीकरण | खूप कमी — विक्रीसाठी काही महिने लागू शकतात | एका क्लिकमध्ये विक्री करता येते |
देखभाल खर्च | दुरुस्ती खर्च,सोसायटी मेंटेनन्स शुल्क,कायदेशीर बाबी | देखभालीची जबाबदारी गुंतवणूकदारावर नसते |
स्थावर मालमत्ता भाडेतत्त्वावरील धोके | भाडेकरूने दुकान रिकामे न केल्यास अडचण निर्माण होऊ शकते किंवा भाडे एकाच भाडेकरूवर अवलंबून असते | एकाच भाडेकरूवर अवलंबित्व नाही |
भांडवल | किमान ४० लाख आणि त्यापेक्षा अधिक | किमान ₹५०० पासून पुढे |
पारदर्शकता | भाडे ठरवणे हे दोन पक्षांमध्ये खाजगी पद्धतीने केले जाते | REIT ची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध असते |
✔ थोडक्यात:REIT मुळे तुम्ही मोठ्या ऑफिस बिल्डिंगचे मालक नसतानाही त्यातून येणाऱ्या भाडे उत्पन्नात भागीदार होऊ शकता.
स्वप्नील जोशी
9619 02 9619

Comments